घुसखोरी करू पाहणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jun-2018
Total Views |

दिवसाच्या सुरुवातीबरोबरच लष्कराची मोठी कारवाई



श्रीनगर : भारतीय सीमेमध्ये घुसखोरी करू पाहणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा आज भारतीय लष्कराने खात्मा केला आहे. जम्मू-काश्मीरमधील माछिल सेक्टरजवळ लष्कराने ही कारवाई केली असून आणखी काही दहशतवादी याठिकाणी लपून बसल्याचा संशय लष्कराने व्यक्त केला आहे. त्यामुळे या दहशतवाद्यांचा शोधासाठी लष्कराने शोधमोहीम सुरु केली आहे.

आज पहाटे माछिल सेक्टरजवळ हे दहशतवादी भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असताना सीमेवर गस्त घालत असलेल्या जवानांच्या दृष्टीस पडले. यानंतर दहशतवाद्यांनी लष्करावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. परंतु सावध असलेल्या लष्कराने देखील उलट कारवाई करत, यातील तीन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. दरम्यान यातील काही दहशतवादी पहाटेच्या अंधाराचा फायदा घेत पसार झाले. यानंतर लष्कराने देखील त्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरु केली आहे.

@@AUTHORINFO_V1@@