विद्युत डीपी ठरतोय धोकादायक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jun-2018
Total Views |



डोंबिवली : पूर्वेतील एमआयडीसी परिसरातील वीज वितरण करणारे डी पी बॉक्स उघडे असल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान लवकरच येणार्‍या पावसाळ्याच्या धर्तीवर या परिसरात अपघात होण्याची शक्यता नाकरता येत नाही.

एमआयडीसी निवासी परिसरातील मिलापनगर तलाव रोडवरील प्लॉट क्र. ९३ समोर वीज वितरणाचा डी पी बॉक्सला दरवाजा गेल्या कित्येक दिवसापासून नसल्याचे दिसत आहे.त्यामुळे हा डीपी बॉक्स उघडा असून या त्याच्या आतील तारा दिसत असल्याने येथे अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे दरम्यान या परिसरातील सुदामानंदन कॉम्प्लेक्स सोसायटी व ग्रीन्स इंग्लिश स्कुल आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लहान मुलांची ये जा होत असताना लवकरच हे काम व्हावे अशी इच्छा येथील नागरिक राजू नलावडे यांनी व्यक्त केली आहे. येथील रस्ता अरुंद असल्याने शाळेची बस किव्हा मोठे वाहन आले तर नागरिकांना, शाळेतील मुलांना या इलेक्ट्रीक डी पी बॉक्सचा धक्का लागून अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबतीत येथील वीज वितरणचे सब इंजिनीअर याना फोट इत्यादी माहिती देऊनही त्यांचाकडून फक्त उत्तर येते की लवकरच दरवाजे बसून घेऊ. निवासी भागात अनेक ठिकाणी डी पी बॉक्सला दरवाजे नाही आहेत. असे हि त्यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@