कुमारस्वामी मंत्रीमंडळाचा आज होणार विस्तार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jun-2018
Total Views |


बेंगळूरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या नव्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर कुमारस्वामी हे आज आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार करणार असून जवळपास दोन्ही पक्षांचे मिळून जवळपास २० आमदार हे आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान शपथ घेणाऱ्या आमदारांची नावे मात्र दोन्ही पक्षांकडून गुप्त ठेवण्यात आली आहेत.

आज दुपारनंतर हा शपथविधी घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी आणि दिल्लीतील कॉंग्रेस नेत्यांनी सुचवलेल्या नावांचा मंत्रीमंडळामध्ये समावेश करण्यात आला आहे. जेडएसने देखील पक्षांतर्गत अनेक बैठका घेऊन मंत्रीपदाच्या नावावर चर्चा केलेल्या आहेत. मंत्रालयांबरोबरच कॅबिनेटच्या विस्तारासंबंधी देखील जेडीएसने अगोदरच चर्चा करून ठेवली असून आपल्या मंत्र्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब देखील केलेला आहे. परंतु या मंत्र्यांची देखील नावे पक्षाकडून गुप्त ठेवण्यात आली आहे.

कुमारस्वामी यांच्या शपथविधीनंतर तब्बल दोन आठवड्यांनंतर कर्नाटक मंत्रीमंडळाचा आज विस्तार होत आहे. अवघे ३८ आमदार निवडून आलेले असताना देखील फक्त कॉंग्रेसच्या बळावर सत्ते आलेल्या जेडीएसची मंत्रीपदांसाठी कॉंग्रेसबरोबर चांगलीच रस्सीखेच झाली होती. कॉंग्रेसच्या तब्बल ७९ आमदारांचा पाठींबा असल्यामुळे मंत्रीपदावरून जेडीएसला अनेक ठिकाणी वाटाघाटी करावी लागली आहे. यामुळेच गेली दोन आठवडे दोन्ही पक्षांमध्ये फक्त चर्चा आणि बैठका सुरु होत्या. परंतु अखेर हा तिढा सुटला असून आज कुमारस्वामी यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@