रस्ताबंद झाल्याने कचर्याच्या गाड्याच्या लांबचलांब रांगा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jun-2018
Total Views |



कल्याण : कल्याण महापलिका क्षेत्रात कचर्‍याचा प्रश्न अधिकच गंभीर होत आहे. सततच्या आगी लागण्याच्या घटनानमुळे कल्याण डम्पिंग ग्राउंड चर्चेत असताना त्याकडे जाणारा रस्ता बंद झाल्याने या परिसरात कचरा वाहून नेणार्‍या गाड्यांच्या भल्या मोठ्या रांगा लागत असून त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. तर दुसरीकडे वेळीच कचरा उचलला जात नसल्याने शहरात साचणार्‍या कचर्‍यामुळे घाण, दुर्गंधी व रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कचरा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु असताना या कागदोपत्री प्रयत्नान बाबत मात्र नागरिक नाराज आहेत. शहरातील कचरा कुंड्या या ऐन दुपारपर्यंत भरून वाहत असतात तो उचलण्यासाठी महपालिकेची यंत्रणा अपुरी पडत आहे. अशातच कल्याण डम्पिंग ग्राउंडवर जाणारा रस्ता बंद झाल्याने डम्पिंग परिसरात कचरा वाहून नेणार्‍या गाड्यांच्या भल्या मोठ्या रांगा दिसून येतात. नजीकचा आलेला पावसाळा आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त धनाजी तोरस्कर यांच्याशी संपर्क साधला असता. सोमवारी पडलेल्या पावसामुळे या ठिकाणी जाणार्‍या गाड्या घसरत होत्या त्यामुळे हा रस्ता बंद होता. पण आता सुरळीत चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

महापौरांनी दिली भेट

संबंधित घटनेची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली महपालिकेच्या महापौर विनिता राणे यांनी डम्पिंग ग्राउंडला भेट दिली व येत्या काही दिवसात हा रस्ता मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले.

@@AUTHORINFO_V1@@