खासदार कपिल पाटील यांचा जनसंपर्क दौरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jun-2018
Total Views |



 

वाडा: खासदार कपिल पाटील यांनी वाडा तालुक्यातील भिवंडी ग्रामीण लोकसभा क्षेत्रात येणार्‍या गावांना भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडविण्यासाठी प्रत्यक्ष चर्चा करून सबंधित अधिकार्‍यांशी दुरध्वनीद्वारे संवाद साधून तातडीने पाठपुरावा करण्याच्या सुचना भाजप तालुका अध्यक्षांना केल्याने नागरिकांनी समाथान व्यक्त केले.

चिंचघर येथे झालेल्या बैठकीमध्ये सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भोईर यांनी कुडूस चिंचघर- गैरापूर रस्त्याचे चालू असलेले काम, कुडूस येथे स्वतंत्र पोलीस ठाणे, वाडा ग्रामीण रूग्णालये, रूग्णालयासाठी शववाहीनी, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वर्षांवर्षाच्या अपुर्‍या सुविधा, अग्नीशमन दल, अंतर्गत रस्ते, चिंचघर येथील ११६ वर्षांपूर्वी च्या जुन्या इमारती ची दुरावस्था असल्याने नविन इमारतीची मागणी अशा विविध समस्या त्यांच्या पुढे ठेवून पाठपुरावा करण्याची विनंती केली. यावेळी त्यांनी निंबवली, केळठण, चांबले, घोणसई, मेट,मुसारणे, चिंचघर, डोंगस्ते, सापरोंडे, मांगाठणे, कोंढले अशा विविध गावांना भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांना उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी त्याच्या सोबत भाजपचे जेष्ठ नेते बाबाजी काठोले, विभागीय चिटणीस योगेश पाटील, जि.प.पालघर महीला व बालकल्याण सभापती धनश्री चैधरी, तालुका अध्यक्ष संदीप पवार, तालुका सरचिटणीस मंगेश पाटील, युवा विभागिय चिटणीस दिनेश पाटील, प.स.उपसभापती जगन्नाथ पाटील, भगवान चैधरी, दशरथ पटील कुंदन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

@@AUTHORINFO_V1@@