छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे रूपडे पालटणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jun-2018
Total Views |



डोंबिवली: शहरातील बच्चे कंपनीचे प्रमुख आकर्षण असलेल्या छत्रपती शिवाजी उद्यानाची परिस्थिती बिकट असल्याने या भागातील स्थानिक नगरसेवक संदीप पुराणिक यांनी या उद्यानाच्या देखभाल दुरुस्ती बाबत सततचा पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या या कामाला यश आले.आणि या उद्यानाच्या देखभाल दुरुस्ती ची जबाबदारी लगतच्या गणेशमंदिर संस्थांनाकडे देण्यात आली आहे. यानुसार या उद्यान दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. येत्या दिवाळीपर्यंत बच्चेकंपनीसाठी नव्याने हे उद्यान खुले होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. श्री गणेश मंदिर संस्थानाने पुढाकार घेत पूर्वेकडील नेहरु रोडवरील छत्रपती शिवाजी उद्यानाच्या देखभालीची जबाबदारी घेतली आहे. महापालिकेने संस्थानाला 5 वर्षांसाठी उद्यान देखभालीची जबाबदारी दिली असून त्यानुसार गणेश मंदिर संस्थानाच्या वतीने या उद्यान दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कामातून काही महिन्यातच या उद्यानाचे रुपडे पालटणार आहे.त्या माध्यमातून सर्वप्रथम बागत येणार्या गर्दुल्ले आणि दारुड्यांवर नियंत्रण आणण्यासाठी संरक्षण भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अत्याधूनिक पद्धतीने हिरवळ, झाडांची लागवड करुन बाग चांगल्या प्रकारे सुशोभित करण्याचे नियोजन सुरु आहे. त्याच कालावधीत अद्ययावत खेळणी बसवण्यात येणार आहेत. त्यासोबतच स्वच्छतेसाठीही विशेष नियोजन करण्याचा संस्थानाचा मानस आहे. सध्या बागेच्या जागेतील अनावश्यक बाबींची तांत्रिक आवश्यकता नसेल तर ते काढुन जागा मोकळी करणे, अधिकाधिक जागेत नागरिकांसाठी मनोरंजन, चिमुरड्यांना विरंगुळा देण्याचा प्रयत्न असेल गणेश मंदिर संस्थानाचा करणार आहे यासठी स्वतः गणेश मंदिर संस्थान अध्यक्ष राहुल दामले यांच्या अखत्यारीत काम सुरु आहे.

@@AUTHORINFO_V1@@