तारखेनंतर आता ट्रम्प-किम भेटीची वेळ देखील जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jun-2018
Total Views |


वॉशिंग्टन डी.सी. : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन यांच्या भेटीच्या तारखेनंतर या भेटीची अधिकृत वेळ आज जाहीर करण्यात आली आहे. १२ जूनला सिंगापूरच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ वाजता ही भेट होणार असून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि किम जोंग उन यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. तसेच उत्तर कोरियाने देखील या भेटीसाठीची आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली असून किम जोंग उन हे या भेटीसाठी अत्यंत उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सिंगापूर येथे आंतरराष्ट्रीय देशांच्या होणाऱ्या एका बैठकीसाठी म्हणून ट्रम्प हे सिंगापूर येणार आहेत. तसेच किम यांना देखील भेटीसाठी याठिकाणी पाचारण करण्यात आलेले आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे. दरम्यान या सर्व देशांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर १२ तारखेला सकाळी ९ वाजता ट्रम्प आणि किम यांची भेट होईल, या भेटीमध्ये अनेक महत्त्वांच्या विषयांवर चर्चा होणार असून विशेषतः अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात नवे मैत्री संबंध प्रस्थापित व्हावे, यावर जास्त भर देण्यात येणार आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे. त्यामुळे अमेरिका आणि उ.कोरिया या दोन्ही देशांसाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची असणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@