गोरगरिबांसाठी जनऔषधी केंद्र जीवनदायी ठरणार : खा. कपिल पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jun-2018
Total Views |

भिवंडी : भाजपचे सरकार हे सर्वसामान्य जनतेला सुखी ठेवण्यासाठी प्रयत्नशील असून, त्याचाच एक भाग म्हणजे जे गोरगरीब रुग्ण महागडे औषधोपचार करू शकत नाहीत. त्यांच्यासाठी जनऔषधी केंद्र जीवनदायी ठरणार आहे. स्वस्त औषधांमुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या औषधांचा वापर सर्वाधिक प्रमाणात होण्यासाठी जनजागृती आवश्यक असून, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर मंडळींनी पुढे येणे गरजेचे असल्याचे मत खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केले.
अंजूरफाटा येथील शंकर डाईंगसमोरील इमारतीमध्ये मनिषा भांगरे यांनी हे औषध केंद्र सुरू केले आहे. त्याच्या उद्घाटन प्रसंगी खा. कपिल पाटील बोलत होते. यावेळी आ. महेश चौघुले, विरोधी पक्षनेता श्याम अग्रवाल, डॉ. विवेक जोशी वगैरे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनऔषधी केंद्र हे गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी सुरू झालेले असून, हेच खरे 'अच्छे दिन' असल्याचे सांगून खा. कपिल पाटील पुढे म्हणाले की, 'शहरात आणखी जनऔषधी केंद्र सुरू करण्यासाठी यापुढील काळात विशेष प्रयत्न करायला हवेत.' केंद्राच्या संचालिका मनिषा भांगरे आणि सुरेश भांगरे, निशी भांगरे आदींनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आभार मानले.
@@AUTHORINFO_V1@@