पेट्रोलवर व्यवहार्य तेवढाच कर लावावा : धर्मेंद्र प्रधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jun-2018
Total Views |

तेलांच्या वाढत्या किमतींचा गैरफायदा न घेण्याचा सल्ला




गुजरात : 'सामान्य नागरिकांचा विचार करून राज्य सरकारांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर व्यवहार्य तेवढाच कर आकारावा' अशी सूचना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली आहे. तसेच तेलाच्या वाढत्या किमतींचा गैरफायदा घेऊन राज्य सरकारांनी त्यातून फायदा उपटण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्ला देखील त्यांनी राज्य सरकारांना दिला आहे.

गेल्या महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलांच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे देशात देखील तेलाचे दरवाढ झाली आहे. यामुळे सामान्य नागरिकांना त्रास होत होता. यावर उपाय काढण्यासाठी म्हणून केंद्र सरकार देखील सातत्याने प्रयत्न करत आहेत. परंतु काही राज्य सरकार हे तेलाच्या वाढत्या दरांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे देशातील सर्व सरकारांनी पेट्रोल आणि डिझेलवर योग्य तेवढाच कर आकारावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

गेल्या महिन्यामध्ये इंधनाच्या दरांमध्ये सातत्यने वाढ झाल्यामुळे देशातील जनता प्रचंड नाराज झाली आहे. यावरून विरोध देखील सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. अशामध्येच भारत आणि रशिया यांच्यात झालेल्या एका व्यापारी करारानंतर रशियावरून पहिली एलएनजी (लिक्विफायड नॅच्युरल गॅस) कार्गो खेप काल भारतामध्ये आली आहे. यापार्श्वभूमीवर प्रधान यांनी देशाला संबोधित करताना, इंधनदरवाढीवरील अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडले, तसेच राज्य सरकारांना देखील वरील सूचना दिल्या.
@@AUTHORINFO_V1@@