आता रेल्वे स्थानकालाही दीनदयाळ यांचे नाव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jun-2018
Total Views |

चांदोली : गुजरातमधील कांडला पोर्टला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव दिल्यानंतर आता उत्तर प्रदेशमधील एका रेल्वे स्थानकाचे देखील जुने नाव बदलून त्याला दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देण्यात येणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने नुकताच याविषयी निर्णय घेतला असून उत्तर प्रदेशमधील 'मुघल सराय जंक्शन' या रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ते 'पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन' असे करण्याचे आदेश दिले आहेत.
उत्तर प्रदेश सरकारने नुकतीच याविषयी एक अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये वाराणसी जवळील चांदोली याठिकाणी असलेल्या 'मुघल सराय जंक्शन' या स्थानकाचे नाव बदलण्याचे आदेश दिले आहेत. या रेल्वे स्थानकाचे जुने नाव बदलून त्याऐवजी त्याला 'पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन' असे करण्याची सूचना यात देण्यात आली. त्यामुळे लवकरच या स्थानकाचे नाव बदलून याला दीनदयाळ यांचे नाव देण्यात येणार आहे.


 

दरम्यान भाजप सरकार सत्तेत आल्यापासून अनेक योजनांना आणि स्थळांना पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देण्यात आले आहे. यावर विरोधकांनी अनेक वेळा आक्षेप देखील घेतला होता. परंतु सरकारने याकडे दुर्लक्ष करत योजनांबरोबरच अनेक सरकारी कार्यालयांना आणि त्यानंतर गुजरातमधील कांडला पोर्टला देखील दीनदयाळ यांचे नाव दिले होते. आता तर रेल्वे स्थानकाला देखील त्यांचे नाव दिल्यामुळे यावर विरोधक आणि सामन्य नागरिकांकडून काय प्रतिक्रिया येते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@