पर्यावरण दिनानिमित्त ‘पालवी २०१८’ कुंडीतील रोपांचे प्रदर्शन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jun-2018
Total Views |

कल्याण : पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन व्हावे, या उद्देशाने नागरिकांमध्ये जागृती निर्माण करून, त्यांच्यात झाडे लावण्याची व जगविण्याची आवड निर्माण करण्यासाठी जागतिक पर्यावरणदिनानिमित्ताने कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ’पालवी २०१८’ हे कुंडीतील रोपांचे प्रदर्शन भरविण्यात आले असून, डोंबिवली येथील महापालिकेच्या विभागीय कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सदर प्रदर्शन ४ व ५ जून रोजी सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात विविध जातींची दोनशे झाडे ठेवण्यात आली असून, ३० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे. यात प्रामुख्याने औषधी वनस्पती, शोभिवंत फुलांची झाडे ठेवण्यात आली आहेत. येथील मुख्य आकर्षण म्हणजे २५ वर्षांच्या जुन्या वडाचे झाड बोन्साय पद्धतीने वाढविले असून, तेही या प्रदर्शनात समाविष्ट आहे. या प्रदर्शनात बदलापूर, ठाणे, कल्याण व डोंबिवलीतील नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला आहे. कुंडीमधील झाडांना कशाप्रकारे पाणी घालावे, जेणेकरून इमारती व त्यांचा रंग खराब होणार नाही, याची काळजी घेण्याकरिता ड्रिप इरिगेशन सिस्टिम बसविण्यात आली आहे. 'दोन दिवस चालणार्‍या या प्रदर्शनास नागरिकांनी भेट देऊन, पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करावे,' असे आवाहन कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@