सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात शशी थरूर दोषी, ७ जुलैला हजर राहण्याचे आदेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jun-2018
Total Views |
 
 

 
 
 
नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात त्यांचे पती आणि काँग्रेस नेते शशी थरूर हे दोषी आढळले असून त्यांना आता येत्या ७ जुलैला दिल्लीच्या पतियाळा हाउस न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश सुनावण्यात आले आहे. पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणी शशी थरूर यांना समन्स जारी करण्यात आला आहे. 
 
 
 
त्यामुळे आता ७ जुलैला दिल्लीच्या पतियाळा हाउस न्यायालयात शशी थरूर यांच्यावर खटला चालवण्यात येणार आहे. सुनंदा पुष्कर यांना आत्महत्येसाठी शशी थरूर यांनी प्रवृत्त केले आहे असे आरोपपत्रात म्हणण्यात आले आहे. त्यामुळे आता शशी थरूर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 
 
 
 
शशी थरुर यांच्याविरोधात दिल्लीच्या पतियाळा हाऊस न्यायालयात कलम ३०६ आणि ४९८ अंतर्गत दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. दिल्ली पोलिसांनी कलम ३०६ नुसार, थरुर यांच्यावर सुनंदा पुष्कर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर घरगुती हिंसाचार प्रकरणी कलम ४९८ अ देखील लावण्यात आले आहे.
 
 
 
सुनंदा पुष्कर यांचा १७ जानेवारी २०१४ रोजी दिल्लीच्या चाणक्यपुरी येथील लीला पॅलेस या फाइव्ह स्टार हॉटेलच्या खोलीमध्ये संशयितरित्या मृत्यू झाला होता. या मृत्यूला पहिल्यांदा आत्महत्या दाखवण्यात आले होते. मात्र आता या तपासात शशी थरूर दोषी असल्याचे पुढे आले आहे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@