श्रमजीवी आणि टोरेंट पॉवर कंपनीतर्फे संयुक्त जनसुनावणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jun-2018
Total Views |



भिवंडी : भिवंडी शहर परिसराला विज पुरवठा करण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून टोरेंट पॉवर कंपनीला ठेका दिलेला आहे. विज कंपनीच्या कार्यपद्धतीवर शहर आणि ग्रामीण भागातील विज ग्राहक अत्यंत नाराज आहेत. शेकडो ग्राहकांनी त्यांना भेडसावणार्‍या तक्रारी श्रमजीवी संघटनेकडे दाखल केलेल्या आहेत. ग्राहकांच्या तक्रारीवर जनसुनावणीचे संयुक्तपणे आयोजन करण्यांत आलेले आहे. या सुनावणी मधुन विज ग्राहकांना समाधान मिळाले नाही तर श्रमजीवी संघटनेतर्फे पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे.

कोंबडापाडा येथील गावदेवी मैदानावर बुधवार दि. ६ जुन रोजी सकाळी ११ वाजता श्रमजीवी संघटना पदाधिकारी आणि टोरेंट पॉवर कंपनीचे अधिकारी हे संयुक्तपणे जनसुनावणीला सामोरे जाणार आहे. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडीत, अध्यक्ष रामभाऊ वारणा, सरचिटणीस बाळाराम भोईर, जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय कोलेकर त्यांचे सहकारी अशोक सापटे, संगिताताई भोमटे, जया पारधी, सुनिल लोणे आदी पदाधिकारी आणि टोरेंट पॉवर कंपनीचे अधिकारी या वेळी उपस्थित रहाणार आहेत. विज ग्राहकांचे समाधान न झाल्यास ग्राहकांना यापुढे न्याय मिळवुन देण्यासाठी संघटनेतर्फे संस्थाध्यक्ष विवेक पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रखर आंदोलन उभारले जाईल अशी माहिती समाजसेवक रोहिदास पाटील यांनी दिली. विजेच्या वापरापेक्षा अधिक बिल विज ग्राहकांना भरावे लागते. महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीतर्फे जी विज शेजारच्या गावांना पुरविली जात आहे त्या बिलांची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणावर तफावत आढळुन येते एकंदरीत टोरेंट पॉवर कंपनी ग्राहकांची लूट करते अशी भावना विज ग्राहकांमध्ये आहे.

@@AUTHORINFO_V1@@