अ‍ॅड. निरंजन डावखरे उद्या भरणार उमेदवारी अर्ज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jun-2018
Total Views |



ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजपच्या वतीने माजी आ. अ‍ॅड. निरंजन वसंत डावखरे यांचा गुरुवार दि. ७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. सीबीडी बेलापूर येथील कोकण भवनमधील विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात अर्ज भरण्यावेळी भाजपच्या मित्र पक्षांच्या लोकप्रतिनिधींबरोबरच हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

कोकण पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व अ‍ॅड. निरंजन डावखरे करीत होते. गेल्या सहा वर्षांच्या काळात त्यांनी कोकणातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांबरोबरच पदवीधर मतदारांचे प्रश्न मांडले होते. त्यातील अनेक प्रश्न सुटले असून, काही मार्गी लागत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून अ‍ॅड. डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी डावखरे यांचे स्वागत केले. तसेच त्यांची विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघासाठी शिफारस केली होती. गेल्या दहा -बारा दिवसांपासून माजी आ. अ‍ॅड. डावखरे यांनी पक्षातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली आहे. तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करुन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांना कार्यकर्त्यांबरोबरच पदवीधर मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

कोकण विभागीय आयुक्तांच्या कोकण भवन (बेलापूर) येथील कार्यालयात अ‍ॅड. निरंजन डावखरे यांच्याकडून गुरुवारी दि. ७ जून रोजी सकाळी साडेदहा वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. या वेळी भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

@@AUTHORINFO_V1@@