महावितरणाने रखडली मध्य रेल्वे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jun-2018
Total Views |



टिटवाळा: मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावर असलेल्या आंबिवली रेल्वे स्थानका नजीकच्या वडवली रेल्वे गेट क्र. ४७ उल्हासनदी पुलाजवळून जाणार्‍या रेल्वे मार्गावर रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर महावितरणची उच्च दाबाची विद्युत वाहिनी पडल्याने मंगळवारी सुमारे एक तासभर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. महावितरणच्या पथकाने ही पडलेली विद्युत वाहिनी बाजूला केल्यानंतर वाहूतक पूर्वपदावर आली. मात्र, एखादी लोकल त्या दरम्यान या विद्युत वाहिनीच्या संपर्कात आली असती तर मोठा अनर्थ घडला असता . त्यामुळे महावितरणाच्या हलगर्जीपणाबाबत रेल्वे प्रशासनाने अहवाल तयार करत महावितरण विरोधात गुन्हा दखल करणार असल्याचे सांगितले आहे.

दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास आंबिवली वडवली रेल्वे ४७ गेट नजीक उल्हास नदीच्या पुलाजवळ खांब क्रमांक ५७ -३५ (आयएसडी) या ठिकाणी उच्च दाब असलेली महावितरणाची विद्युत वाहिनी या रेल्वे रुळावर असलेल्या ओव्हरहेड वायरवर पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी अनेक प्रवाश्यांना रेल्वे पटरीतून चालत प्रवास करत पायपीट करावी लागली . यावेळी घटना स्थळी धाव घेत महावितरण च्या पथकासह रेल्वे च्या अधिकारी कर्मचार्यांनी महावितरणाच्या पथकाने एक तासानंतर ही वायर काढण्यात यश आले आणि वाहतूक पुन्हा सुरु झाली . ७ नंबर फिडरची उच्चदाब असलेली विद्युत वहिनी तुटून रेल्वेच्या ओव्हरहेड वायर वर पडली होती . वायर तत्काळ बाजूला करण्यात आली तसेच लवकरच हि वाहिनी भूमिगत करणार आहोत. असे महावितरणचे अधिकारी जे यादव यांनी सांगितले .तर रेल्वे अधिकार्‍यांनी या घटनेबाबत अहवाल तयार करत महावितरण विरोधात गुन्हा दखल करणार असल्याचे सांगितले

रविवारी पावणे बाराच्या सुमारास देखील वडवली ४७ रेल्वे गेटा या रेल्वे क्रोसिंग फाटकात एका डंपर बंद पडल्याने सुमारे पाऊन तास रेल्वे वाहतुकीवर खोळंबली होती. तर आज पुन्हा महावितरणाच्या भोंगळ कारभाराचा फटका रेल्वेला बसला.

@@AUTHORINFO_V1@@