पद्मानगर भागात धोकादायक इमारतीमध्ये अनधिकृत बांधकाम तोडण्यास दिरंगाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jun-2018
Total Views |



भिवंडी : भिवंडी महापालिका प्रभाग समिती क्र. अंतर्गत पद्मानगर भागातील अलंकार सिनेमागृह परिसरातील छाया निवास ही इमारत मोडकळीस आल्याने दि. ११ सप्टेंबर २०१६ रोजी इमारत मालक भोगवटाधारक यांना पालिकेने नोटिसा दिल्या होत्या. या संधीचा फायदा इमारत मालकाने घेऊन, इमारत खाली करून घेतल्यानंतर धोकादायक इमारतींत ५० बाय ४३ मोजमापाच्या जागेत १२ खोल्यांचे बांधकाम करून, परस्पर भाड्याने दिल्या. सदर बाब भोगवटाधारकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित कार्यालयांकडे तक्रारी केल्या, पण कार्यवाही झाली नाही. अखेर आयुक्त मनोहर हिरे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली असता, प्रभाग समिती क्र. चे सहाय्यक आयुक्त सोमनाथ सोष्टे यांच्याकडून अहवाल मागविला. सदर अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी तक्रारदार यांना दिले.

महापालिका कार्यक्षेत्रात मोठ्या संख्येने धोकादायक इमारती आहेत. सदर इमारती जमीनदोस्त करण्याऐवजी रंगरंगोटी करून, त्याचा राजरोसपणे वापर केला जातो. तसाच काहीसा प्रकार हा छाया निवास बाबत घडलेला आहे. श्रीहरी लक्ष्मण कोट्टा यांच्या मालकीच्या इमारतीत एकूण १६ निवासी आणि तळमजल्यावर यंत्रमाग कारखाना होता. ही सर्व मंडळी पागडी पद्धतीने इमारतीत अनेक वर्षांपासून राहत होती. इमारत मोडकळीस आल्याने प्रभाग कार्यालतर्फे नोटीस देऊन, ती खाली करण्यास सांगण्यांत आले. पण कारवाई करण्यात आली नाही. महापालिकेकडून जागेचा पंचनामा करून, भोगवटाधारक भगवान आडेप असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर जागेतून यंत्रमाग हलविण्यात आले. इमारत मालकास जागा ताब्यात देण्यात आली आहे. भोगवटाधारकांनी या प्रकरणी महापालिका आणि पोलीस विभाग यांच्याकडे तक्रारी केल्या. पोलिसांनी दिवाणी स्वरूपाची बाब असल्याचे कारण पुढे करीत कारवाई केली नाही. तर प्रभाग अधिकारी यांच्याकडूनही कारवाईस दिरंगाई झाली आहे.

@@AUTHORINFO_V1@@