पावसाळ्यापूर्वी नाले बांधणीच्या कामाला सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jun-2018
Total Views |

 

डोंबिवली : कडोंमपाच्या भोंगळ कारभाराविरोधात कायमच नागरिक हैराण असतात. असाच एक घाट नव्याने केडीएमसीने घातला आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर केडीएमसीने स्टेशन परिसरात लागून असलेल्या मोठ्या नाल्यांच्या बांधणीचे काम हाती घेतले आहे.

पावसाळ्यात पाणी तुंबू नये यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी गटार बांधण्याचे काम हाती घेतले आहे. यात प्रामुख्याने शिवामार्केट ते टिळकपथ मार्गावर नाले बांधणीचे काम सुरू आहे, तर उर्सेकर वाडी परिसरात गटार बांधणीचे काम सुरू आहे.

टिळक पुतळ्याशेजारील रोड सातत्याने वाहने पार्क केली जातात. त्यामुळे त्या गटाराच्या स्लॅबवरील झाकणे तुटतात. ही झाकणे बदलून, तीन इंचाची झाकणे टाकण्याचे काम करण्यात येनर असल्याची माहिती येथील स्थानिक नगरसेवक विश्वदीप पवार यांनी दिली. या कामाचे आदेश देण्यात आले असून, एका महिन्यात हे काम पूर्णत्वास येईल असेही त्यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@