उंबर्डे तलावाचे सुशोभीकरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jun-2018
Total Views |






डोंबिवली : उंबर्डे तलवाचा लवकरच कायापालट होणार असून या संदर्भात सुरु आलेल्या कामांची पाहणी सोमवारी कल्याण डोंबिवली महापालिकेचे स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी केली .हे तलाव सुशोभीकरण करण्याचा निर्णय केडीएमसीने घेतला असून ह्या अंतर्गत सुमारे ६ हजार झाडे हि लावण्यात येणार आहेत.

कल्याण हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जायचे कालांतराने दुर्लक्षिते अभावी ह्याशहरातील तलावांचे सौंदर्य विकोपाला गेले .व तलाव नामशेष झाले आजवरती फक्त कल्याणच्या काळा तलावाला प्राधान्य देण्यात आले .मात्र आता ह्या तलावांचे संवर्धन व सुशोभीकरण करण्याचा निर्णय केडीएमसी ने घेतला असून त्या अंतर्गत सरकारच्या अमृत योजने मार्फत हरितक्षेत्र विकासासाठी २ कोटींचा निधी महापालिकेला प्राप्त झाला आहे . उंबर्डे येथील १० एकर च्या जागेवर वृक्षा रोपण करण्या साठी केडीएमसीने खड्डे खोदण्याचे काम केले आहे . या ठिकाणी सुमारे ६ हजार झाडे लावण्यात येणार असून यात प्रामुख्याने वड, पिंपळ , कडुलिंबा सारख्या लोकोपयोगी झाडांचा समावेश असून हे काम जून अखेर पर्यंत पूर्ण करण्याचे सरकारचे आदेश आहे . या पाहणी दरम्यान दामले यांनी या ठिकाणी असेलल्या विहिरीचे संवर्धन करण्याचे आदेश दिले . या ठिकाणी असलेल्या विहिरीला उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पाण्याचे झरे जिवंत असल्याने या पडीक विहरीचे बांधकाम करण्याचे आदेश सभापती दामले यांनी उद्यान विभागाला दिले . कल्याणातील दुर्गामाता चौकातील भटाळे तलाव भूमाफियांनी भरणी करून नष्ट केल्याचा अनुभव ताजा असल्याने उंबर्डे तलावाला संरक्षक भिंत उभारून त्याच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश या पाहणीनंतर देण्यात आले. या तलावाच्या सुशोभीकरणावर सुमारे १० कोटी रुपयांचा खर्च होण्याची अपेक्षा पालिका अधिकार्‍यांनी व्यक्त केली.

@@AUTHORINFO_V1@@