नवी मुंबईत झोपड्यांवर कारवाई दरम्यान : जमावाची दगडफेक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jun-2018
Total Views |



नवी मुंबई : कोपरखैरणे येथे बालाजी मल्टिप्लेक्ससमोर सिडकोच्या भूखंडावरील बेकायदा झोपड्यांवर कारवाई केल्याने संतप्त जमावाने पोलीस आणि अतिक्रमणविरोधी पथकावर दगडफेक केली. यात कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी आवटे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बेकायदा झोपड्यांवर कारवाई आणि त्यानंतर झालेल्या दगडफेकीच्या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सिडकोने तूर्तास कारवाई स्थगित केली. पावसाळा तोंडावर आल्यावर सिडकोने झोपड्यांवर कारवाई सुरू केल्याने झोपडीधारक आक्रमक झाले आणि त्यांनी दगडफेक करण्यास सुरूवात केली. कोपरखैरणेतील झोपडपट्टी मधील रहिवाशांनी कारवाई टाळण्यासाठी तुफान दगडफेक केली. घटनास्थळी शीघ्र कृती दलाचे पथक मागवण्यात आले. रस्त्याच्या एका बाजूला पोलिस तर दुसर्‍या बाजूला हातात दगड घेवून जमाव उभा आहे. अखेर काही तासांनी जमावाला पांगवण्यात आले.

@@AUTHORINFO_V1@@