चंद्रपूरात टाटा ट्रस्‍टच्‍या सहकार्याने १०० खाटांचे कर्करोग रूग्‍णालय उभारणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
 

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने राज्‍य मंत्रीमंडळाचा महत्‍वपूर्ण निर्णय


चंद्रपूर : चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय परिसरात राज्‍य शासनाचा वैद्यकिय शिक्षण विभाग, जिल्‍हा खनिज प्रतिष्‍ठान चंद्रपूर आणि टाटा ट्रस्‍ट यांच्‍या माध्‍यमातुन खाजगी भागीदारी तत्‍वावर १०० खाटांचे कर्करोग रूग्‍णालय उभारण्‍याचा निर्णय राज्‍य मंत्रीमंडळाने आज घेतला. राज्‍याचे अर्थमंत्री व चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर येथे कॅन्‍सर हॉस्‍पीटल अर्थात कर्करोग रूग्‍णालय उभारण्‍याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
 
टाटा ट्रस्‍टच्‍या सहकार्याने चंद्रपूर येथे १०० खाटांचे कर्करोग रूग्‍णालय उभारण्‍यात यावे यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्‍या वर्षभरापासुन टाटा ट्रस्‍टकडे पाठपुरावा केला आहे. यासंदर्भात टाटा ट्रस्‍टच्‍या पदाधिका-यांसमवेत अनेक बैठकी सुध्‍दा त्‍यांनी घेतल्‍या. टाटा ट्रस्‍टच्‍या माध्‍यमातुन चंद्रपूर येथे सदर रूग्‍णालय उभारण्‍यासंदर्भात होकार मिळाल्‍यानंतर आज झालेल्‍या राज्‍य मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत हा विषय चर्चेला आला असता याबाबतच्‍या प्रस्‍तावाला मंत्रीमंडळाने मान्‍यता प्रदान केली आहे.
 
 
चंद्रपूर जिल्‍हयाची लोकसंख्‍या सुमारे २३  लक्ष असुन त्‍यात दरवर्षी ०.६ टक्‍क्‍याने वाढ होत आहे. सदर जिल्‍हयात प्रदुषणाची तिव्रता अधिक आहे. त्‍यामुळे कर्करोगाने ग्रस्‍त रूग्‍णांचे प्रमाण सुध्‍दा जिल्‍हयात मोठया प्रमाणावर आहे. चंद्रपूर व नजिकच्‍या जिल्‍हयातील कर्करोगग्रस्‍त रूग्‍णांना सर्वंकष व अत्‍याधुनिक कर्करोग उपचाराच्‍या सोयीसुविधा उपलब्‍ध होण्‍यासाठी राज्‍य शासनासह, कर्करोग उपचार व संशोधन क्षेत्रामध्‍ये अग्रगण्‍य व नामांकित असलेल्‍या टाटा ट्रस्‍ट तसेच जिल्‍हा खनिज प्रतिष्‍ठान चंद्रपूर यांच्‍या माध्‍यमातुन खाजगी भागीदारी तत्‍वावर १००  खाटांचे कर्करोग रूग्‍णालय उभारण्‍याचा प्रस्‍ताव विभागाने सादर केला व या प्रस्‍तावाला आज मंजूरी देण्‍यात आली. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@