सुषमा स्वराज द.आफ्रिकेत सुखरूप दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jun-2018
Total Views |


केपटाऊन : भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज या सुखरूप दक्षिण आफ्रिकेमध्ये पोहोचल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. 'स्वराज या सुखरूप द.आफ्रिकेमध्ये पोहोचल्या असून याठिकाणी द.आफ्रिकेचे राष्ट्रपती सायरील रामाफोसा यांची त्यांनी नुकतीच भेट घेतली आहे,' अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

स्वराज याचे द.आफ्रिकेमध्ये आगमन झाल्यानंतर द.आफ्रिका प्रशासनाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर रामाफोसा यांनी स्वराज यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. तसेच भारत आणि द.आफ्रिका यांच्या मैत्रीपूर्ण संबंधांवर द्विपक्षीय चर्चा केली. भारत हा द.आफ्रिकेचा अत्यंत चांगला मित्र असून गेल्या काही वर्षांमध्ये दोन्ही देशांचे संबंधांमध्ये अत्यंत वेगाने प्रगती झाली असल्याचे मत रामाफोसा यांनी व्यक्त केले. स्वराज यांनी देखील आपल्या स्वागतासाठी रामाफोसा यांचे आभार व्यक्त केले.





ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या द.आफ्रिकेमध्ये होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी म्हणून स्वराज या काल द. आफ्रिकेला रवाना झाल्या आहेत. द.आफ्रिकेकडे जात असताना मॉरिशसजवळ सायंकाळी ४ वाजण्याचा सुमारास स्वराज यांच्या विमानाचा एटीसी (एअर ट्रॅफिक कन्ट्रोल) बरोबर असलेला संपर्क तुटला होता. तब्बल १४ मिनिटे स्वराज यांचे विमान संपर्काबाहेर असल्यामुळे सर्वांनाच काळजी लागली होती. परंतु त्यानंतर मात्र विमानाशी पुन्हा एकदा संपर्क प्रस्थापित करण्यात मॉरिशस एटीसीला यश आले होते.
@@AUTHORINFO_V1@@