बुलेट ट्रेन विरोधात आता शिवसेना देखील मैदानात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jun-2018
Total Views |



पालघर :
मुंबई-अहमदाबाद दरम्यान उभारण्यात येणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाविरोधात आता शिवसेना देखील मैदानात उतरली आहे. पालघरमधील सामन्य नागरिकांचा विचार करून कोणत्याही राजकीय स्वार्थाशिवाय शिवसेना बुलेट ट्रेनविरोधात पालघरमधील स्थानिक शेतकऱ्यांना पाठींबा देणार असल्याची घोषणा शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हेयांनी आज केली आहे. शिवसेनाही कायम सामान्य नागरिकांच्या पाठीशी उभी राहिली असून आता देखील फक्त सामान्य नागरिकांचा विचार करूनच हा पाठींबा देण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

'सरकारने सामान्य नागरिकांचा विचार करून बुलेट ट्रेन उभारण्याऐवजी रेल्वेच्या पराभूत सुविधांमध्ये अधिक सुधारणा करायला हवी, असे मत गोऱ्हेयांनी व्यक्त केले आहे. पालघरमधील नागरिकांना मुंबईमध्ये कामासाठी म्हणून वारंवार जावे लागते. यासाठी त्यांना वारंवार लोकल रेल्वेनी प्रवास करावा लागतो. यामध्ये अनेक वेळा लोकलच्या खराब सेवेमुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, त्यामुळे काही ठराविक लोकांच्या हट्टापायी कोट्यवधी रुपये खर्च करून बुलेट ट्रेन उभारण्याऐवजी सरकारने येथील स्थानिक रेल्वे परिवहनामध्ये अधिक सुधारणा घडवून आणाव्यात अशी मागणी देखील गोऱ्हेयांनी केली आहे.

शिवसेनेच्या या निर्णयानंतर बुलेट ट्रेनला विरोध करणाऱ्या विरोधकांमध्ये आणखी एका पक्षाची भर पडली आहे. केंद्र सरकारच्या या महत्त्वकांक्षी प्रकल्पाला सुरुवातीपासूनच राज्यातील विरोधकांकडून विरोध केला जात होता. दरम्यान कालच विरोधकांकडून पालघरमध्ये बुलेट ट्रेन विरोधी जनमंचाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देखील सर्व विरोधकांसह शिवसेना सहभागी झाली होती. परंतु इतके दिवस सरकारमध्ये असताना देखील शिवसेना आताच बुलेट ट्रेनविरोधात का उतरली आहे ? असा प्रश्न अनेकांना पडत आहे.
@@AUTHORINFO_V1@@