शिलॉंगमध्ये ४०० जणांकडून जवानांवर दगडफेक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jun-2018
Total Views |
 
 


शिलॉंग : मेघालयची राजधानी शिलॉंग येथे गेल्या चार दिवसांपासुन सुरु असलेला हिंसाचार काही केल्या थांबण्यास तयार नाही. दोन समाजांमध्ये सुरु असलेला हिंसाचार रोखण्यासाठी शिलॉंगमध्ये संचारबंदी लागू केल्यानंतर जवानांवरच दगडफेक केल्याची घटना घडली आहे. तब्बल ४०० जणांकडून जवानांच्या शिबिरावर दगडफेक करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून दगडफेक नेमकी कोणी केली ? याविषयी माहिती अजून समोर आलेली नाही.


शिलॉंगमधील मोवलाई पुलाजवळ काल रात्री ही घटना घडली. शिलॉंगमध्ये संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर याठिकाणी सीआरपीएफच्या जवानांची छावणी पडली होती. यावेळी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास काही आंदोलक याठिकाणी आले व जवानांच्या शिबिरावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. प्रत्यक्षदर्शी सैनिकांच्या माहितीनुसार तब्बल ४०० जणांचा हा जमाव होता. यानंतर सैनिकांनी कारवाई सुरु केल्यानंतर थोड्याच वेळात हा संपूर्ण जमाव पळून गेला.


दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री कॉनरड संगमा यांनी या दगडफेकीवर भाष्य करताना, या दगडफेकीमागे काही आप मतलबी लोकांचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शहरामध्ये हिंसाचार भडकवण्यासाठी तसेच अशांतता निर्माण करण्यासाठी जमावाला पैसे देऊन हे दगडफेक करवली जात असल्याचे संगमा यांनी म्हटले आहे. तसेच या घटनेची चौकशी करून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे देखील त्यांनी म्हटले आहे.


गेल्या चार दिवसांपूर्वी शिलॉंगमधील एका बसमध्ये एक शीख समुदायाची मुलगी आणि बस कंडक्टर यांच्या झालेल्या शाब्दिक वादामुळे दोन समुदायांमध्ये दंगल उसळली होती. पोलिसांनी ही दंगल शांत केल्यानंतर काही समाजकंटकांकडून याविषयी काही अफवा उठवण्यात आल्या होत्या. यामुळे हा हिंसाचार आणखी भडकला होता. यानंतर याठिकाणी सीआरपीएफला तैनात करण्यात आले व शहरात संचारबंदी देखील लागू करण्यात आली होती.
@@AUTHORINFO_V1@@