राष्ट्रपती कोविंद घेणार राज्यपालांची बैठक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jun-2018
Total Views |

दोन दिवसीय परिषदेचे आजपासून राष्ट्रपती भवनात आयोजन 



नवी दिल्ली : देशांतर्गत असलेले प्रश्न आणि विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी म्हणून राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आजपासून देशातील सर्व राज्यपालांची दोन दिवसीय बैठक घेणार आहेत. राष्ट्रपती भवनामध्ये ही दोन दिवसीय बैठक पार पडणार असून राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते आज या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

या दोन दिवसीय बैठकीसाठी सर्व राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल काल राष्ट्रपती भवन येथे दाखल झाले आहेत. राज्यपालांबरोबरच उप राज्यपालांना देखील राष्ट्रपतींनी या बैठकीचे आमंत्रण दिले होते. त्यामुळे सर्व राज्यपाल आणि उपराज्यपाल काल नवी दिल्लीमध्ये आले. यानंतर राष्ट्रपती कोविंद यांनी या सर्वांचे स्वागत करून त्याचे आदरतिथ्य केले. तसेच सर्व मान्यवरांना चहापानासाठी बोलावून त्यांच्याशी काही काळ चर्चा देखील केली.

या दोन दिवसीय परिषदेमध्ये देशाहिताच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. राष्ट्रपती महोदयांबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी, नीती आयोगचे संचालक आणि केंद्र सरकारमधील काही मान्यवर देखील या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीच्या समारोप कार्यक्रमामध्ये राष्ट्रपती कोविंद यांच्या बरोबरच पंतप्रधान मोदी हे देखील उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन करणार आहेत.

@@AUTHORINFO_V1@@