शेतकरी आंदोलनाचा चौथा दिवस ; सर्व व्यवहार सुरळीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jun-2018
Total Views |



पुणे : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी किसान महासंघाने पुकारलेल्या शेतकरी आंदोलनाच आजचा सलग चौथा दिवस असून शेतकऱ्यांनी अजूनही आपला संप मागे घेतलेला नाही. दरम्यान शेतकरी संघटनांनी संप जरी सुरु ठेवला असला तरी देखील भाजीपाल्याच्या आवकमध्ये कसल्याही प्रकारच परिणाम झालेला नाही.  सर्व ठिकाणी व्यवहार सुरळीतपणे पार पडत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. नागरिक आणि व्यापारी वर्गावर देखील या आंदोलनाचा कसलाही परिणाम पडलेला नसून सर्व काही व्यवस्थित असल्याची प्रतिक्रिया व्यापारी वर्गाकडून देण्यात येत आहे.


पुण्यातील मार्केटयार्डमध्ये नेहमीप्रमाणे भाजीपाल्याची आवक सुरु असून अडतदारांचे सर्व व्यवहार देखील नेहमीप्रमाणे सुरु आहेत. पुण्याच्या आसपासच्या परिसरातील सर्व शेतकरी आपला शेतमाल नेहमीप्रमाणेच मार्केटयार्डमध्ये पाठवत आहेत. तसेच आपापले व्यवहार देखील करत आहेत. त्यामुळे आंदोलनाचा कसलाही परिणाम व्यवहारावर पडत नसल्याची प्रतिक्रिया येथील काही व्यापारी वर्गाकडून दिली जात आहे. अगदी हीच परिस्थिती राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे. अनेक ठिकाणी व्यवहार पूर्णपणे सुरळीत असून बहुतांश शेतकऱ्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचे एकंदरीत दिसत आहे.

 

हे तर ठेकेदारांचे आंदोलन : राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी या आंदोलनावर जोरदार टीका केली असून 'हे आंदोलन सामन्य शेतकऱ्यांचे नसून हे फक्त ठेकेदारांचे आंदोलन आहे' अशी टीका शेट्टी यांनी केली आहे. राज्यातील शेतकरी त्रस्त असताना देखील काही राजकीय पक्ष आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांनी या आंदोलनाला केव्हाच नाकारले असून काही ठरावी लोकच हे आंदोलन करत असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे. .

 
दरम्यान आंदोलनाला पाठींबा देणाऱ्या काही शेतकरी संघटनांकडून सरकारला अजूनही धमक्या आणि इशारा देण्याचे काम सुरूच ठेवलेले आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचे सांगत जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असे इशारा काही संघटना देत आहेत. परंतु आंदोलनाला राज्यात मिळणाऱ्या पाठींब्यावरून हे आंदोलन पूर्णपणे 'फ्लॉप' ठरत असल्याचेच एकंदरीत दिसून येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@