शेतकऱ्यांचा बेमुदत संपामुळे भाज्यांच्या दरात वाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jun-2018
Total Views |



कल्याण : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाचा परिणाम शनिवारी दिसून आला यामुळे सर्वसामान्य बाजारातील भाजीपाल्यासह कल्याण कृषी उत्पन्न समिती बाजारपेठेतील भाव दुपटीने वाढले आहेत. तर दुसऱ्या दिवशी रविवारी ही परिस्थिती ‘जैसे-थे दिसून आली.

राज्यभरातील शेतकरी रस्त्यावर उतरले असून, बळीराजाच्या या संपामुळे सर्वच बाजार समितीतील भाजीपाल्याची आवक घटली आहे. यामुळे भाजीपाला पुरवठ्यावर मोठा परिमाण झाला असून, १५ ते २० टक्क्यांनी भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत राज्यातून व परराज्यातून ट्रक, टेम्पोत भाजीपाला व फळांच्या मालाची दररोज किमान दोनशे गाड्यांची ‘ये-जा असते. मात्र, शनिवारी महाराष्ट्रातील सुमारे ३७ तर महाराष्ट्रबाहेरील ११ ट्रक भाजीपाल्याचे आले. पालेभाज्यांचा पाच टेम्पो माल आला. अन्नधान्याचे १२ ट्रक, फुलांचे नऊ टेम्पो, फळांचे दोन ट्रक व सात टेम्पो माल आला. एकूण चार हजार ६३० क्विंटल मालाची आवक झाली. निम्म्याहून कमी आवक झाली आहे. शेतकरी संपाच्या तिसऱ्या दिवशी केवळ नाशिक, जुन्नर, नगर, आळेफाटा याच भागातून शेतमाल बाजारात दाखल झाला. आवक घटल्याने घाऊक बाजारात भाजीपाल्यांच्या दरात पंधरा ते वीस टक्के वाढ झाली आहे. तर किरकोळ बाजारातील दरांची वाढ सुमारे पंचवीस टक्क्यांवर पोहोचली असून, भाजीपाल्याची आवक घटल्याने याचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे.

दरम्यान, रविवारी महराष्ट्रातील ५९ तर महाराष्ट्राबाहेरील १६ ट्रक कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाले. याच बरोबर पालेभाज्यांचे ११, कांदा बटाट्याचे ११, फळे आठ, फुले १४, इतर अन्नधान्याचे पाच ट्रक आले. यातून सुमारे चार हजार १३२ क्विंटल मालाची आवक झाली आहे. या उपर सर्वसामान्य बाजारात उपोषणाआधीच भाज्यांच्या दरात वाढ झाल्याची माहिती कृषी उत्पन्न माजी सभापती रवींद्र घोडविंदे यांनी दिली. फ्लॉवर ४५ रुपये, तर गवार ६० रुपये किलो, शिमला मिरची ५० रुपये किलो, भेंडी ५५ रुपये किलो, हिरवी मिरची ५० रुपये किलो, टोमॅटो २२ रुपये, वांगी ४५ रुपये, शेवगा ६० रुपये दराने मिळत आहे.

@@AUTHORINFO_V1@@