नीट-२०१८चा निकाल आज होणार जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jun-2018
Total Views |


नवी दिल्ली :
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड अर्थात सीबीएसईकडून घेण्यात आलेल्या नीट-२०१८ परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने परीक्षेच्या निकालाला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर आज दुपारी नीटचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरूप यांनी दिली आहे.
नीट परीक्षेच्या निकालाला स्थगिती देण्याच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली असून परीक्षेच्या निकालाला स्थगिती देता येत नसल्याचे न्यायालयाने आज स्पष्ट केले. तसेच नीटचा निकाल जाहीर करण्याची परवानगी देखील सरकारला दिली. न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर स्वरूप यांनी ट्वीटकरून आज दुपारी २ वाजता नीट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. तसेच सीबीएसईच्या https://cbseneet.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल, असेही स्वरूप यांनी स्पष्ट केले आहे.



 
वैद्यकीय शाखेमध्ये प्रवेशासाठी सीबीएसईने गेल्या ६ मे ला नीट-२०१८ ची परीक्षा घेतली होती. यावेळी संपूर्ण देशभरातून एकूण १३ लाख २६ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यानंतर २५ मे ला या परीक्षेची उत्तरपत्रिका सीबीएसईकडून प्रकाशित करण्यात आली होती व विद्यार्थांना आपल्या अडचणी विचारण्यासाठी म्हणून दोन दिवसांचा वेळ देखील देण्यात आला होता. परंतु काही पालकांकडून निकालावर आक्षेप घेत निकालाला स्थगिती देण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती.  
@@AUTHORINFO_V1@@