जम्मू काश्मीर येथे लष्कराच्या गाडीवर ग्रेनेड हल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jun-2018
Total Views |

 
 
श्रीनगर :  जम्मू काश्मीर येथे सुरु असलेले हल्ल्याचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. काल जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी गोळीबारानंतर आता आज पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी भारतीय लष्करावर ग्रेनेड हल्ला केला आहे. या हल्ल्यात ५ लोक जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना जम्मू काश्मीरच्या शोपियाँ भागात घडली.
 
 
 
 
भारतीय लष्कराची गाडी गस्त घालत असताना अचानक दहशतवाद्यांनी गाडीवर ग्रेनेड हल्ला केला. यामधून लष्कराची गाडी बचावली असली तरी ५ लोक जखमी झाले असल्याचे कळत आहे. काल झालेल्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले होते. या हल्ल्यातून सावरण्याच्या आतच आज आणखी एक हल्ला झाल्याने काश्मीर येथे वातावरण आणखी चिंतेचे झाले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील व्हायरल झाले आहे. 
भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधीच्या उल्लंघनावरुन चर्चा सुरु आहे. रमजानच्या महीन्यात काश्मीर येथे गोळीबार किंवा इतर कुठलीही कारवाई करण्यात येऊ नये, यासाठी काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारकडे आवाहन केले होते. त्यांची मागणी केंद्र सरकारतर्फे सशर्त मान्य देखील करण्यात आली होती. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार दहशतवादी हल्ला झाल्यास, किंवा दहशतवादी गतिविधी आढळल्यास भारतीय लष्कराला कारवाई करण्यास पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. हे बोलणे झाल्यानंतर देखील सतत जम्मू काश्मीर येथे भारतीय लष्करांवर हल्ले होत आहेत. भारतीय लष्कर देखील या हल्ल्यांना चोख प्रत्यूत्तर देत आहे.
@@AUTHORINFO_V1@@