गोपीनाथ गड’ हे कन्येने पित्यासाठी निर्माण केलेले पहिले स्मारक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jun-2018
Total Views |
 

 
 
 
नाशिक : भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस, केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या चौथ्या पुण्यतिथीदिनी शहर भाजप कार्यालय, वसंतस्मृती येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करण्यात आले.
 
याप्रसंगी भाजप शहर सरचिटणीस उत्तमराव उगले, युवा मोर्चा सरचिटणीस अमित घुगे, महिला आघाडी सरचिटणीस मोहिनी भगरे आदींनी मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.” गोपीनाथ गड हे परळी येथे मुंडे यांच्या अंतविधीच्या जागेत एका कन्येने आपल्या पित्याच्या स्मरणार्थ निर्माण केलेले जगातील पहिले स्मारक असून, हे स्मारक पुढील पिढ्या भाजप कार्यकर्त्यांना प्रेरणा देत राहील. भारतीय जनता पक्षाला वाड्या-वस्तीवर घेऊन जाण्याचे काम प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, उत्तमराव पाटील, सूर्यभान वाहाडणे, अलीकडच्याच काळात निधन झालेले प्रा. ना. स. फरांदे व नुकतेच ज्यांचे निधन झाले ते पांडुरंग फुंडकर या नेत्यांनी केले.
 
 
दुदैवाने आज ही नेतृत्वाची पहिली फळी आपल्यामध्ये नसून, त्यांनी दिलेल्या संस्कारांवर भाजपच्या कार्यकर्त्यांना आगामी काळात वाटचाल करावी लागेल. आज आपण खूप सुखसुविधा असताना पक्षाचे काम करतो, परंतु या नेत्यांनी प्रतिकूल काळात कुठलीही सुबत्ता नसताना लोक हेटाळणी करत असताना सततच्या संघर्षातून पक्षाची बांधणी केली,” असे अमित घुगे म्हणाले.
याप्रसंगी उदय रत्नपारखी यांनी सूत्रसंचालन केले. तसेच याप्रसंगी भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
@@AUTHORINFO_V1@@