मुंबईतील ब्रिटिशकालीन इमारती ठरल्या 'जागतिक वारसा स्थळं'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jun-2018
Total Views |




मुंबई : मुंबईतील ब्रिटिशकालीन इमारतींना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले आहे. यात मुंबई विद्यापीठ, उच्च न्यायालय, छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय आणि महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाचा समावेश करण्यात आला आहे. मुंबईसाठी ही नक्कीच गौरवास्पद बाब ठरली आहे. १९ व्या शतकातील व्हिक्टोरियन संरचना आणि २० व्या शतकातील आर्ट डेको इमारतींचा यात समावेश आहे.

 

बहरीनमधील मनामा येथे सुरू असलेल्या ४२ व्या परिषदेत ही घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी अजंठा, एलिफंटा, वेरूळ व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची इमारत आदींचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत झाला आहे. त्यापाठोपाठ दक्षिण मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक व कला वास्तूंचा (आर्ट डेको) समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. जागतिक वारसा यादीत समावेश झालेल्या १९ व्या आणि २० व्या शतकातील या इमारतीत उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ, जुने सचिवालय, राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय, एल्फिस्टन महाविद्यालय, डेव्हिड ससून ग्रंथालय, छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय, पश्चिम रेल्वे मुख्यालय, महाराष्ट्र पोलीस मुख्यालय, ओव्हल मैदान या व्हिक्टोरियन वास्तुशैलीच्या इमारती तसेच क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, बॅकबे रेक्लमेन्सनची पहिली रांग, दिनशॉ वाछा रोडवरील राम महल, इरॉस व रिगल सिनेमा हॉल तसेच मरिन ड्राईव्ह येथील पहिल्या रांगेतील इमारती आदी वास्तूंचा समावेश आहे. युनेस्कोच्या या निर्णयामुळे देशातील वारसा स्थळांच्या यादीत ३७ व्या स्थळाचा समावेश होणार असून सर्वात जास्त वारसा स्थळे असलेल्या देशांच्या जागतिक क्रमवारीत भारत ७ व्या क्रमांकावर येणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@