सुबोध जयस्वाल मुंबई पोलिस आयुक्तपदी; तर पडसलगीकर पोलिस महासंचालक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jun-2018
Total Views |




मुंबई : मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी १९८५ च्या बॅचचे आयपीएस सुबोध जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणा अर्थात 'रॉ'मध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत असलेले सुबोध जयस्वाल ५५ वर्षांचे असून त्यांच्या सेवानिवृत्तीला पाच वर्षे बाकी आहेत.

 

सुबोध जयस्वाल हे तेलगीच्या बनावट मुद्रांक घोटाळ्याचे तपास अधिकारी होते. सोबतच राज्याच्या नक्षलग्रस्त परिसरातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले होते. २००६ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या तपास पथकातही त्यांचा समावेश होता. त्याचबरोबर मुंबई पोलिसात अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले आहे. आज राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर हे निवृत्त झाले. त्यांचा निरोप समारंभही करण्यात आला. तर विद्यमान मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची राज्याचे नवीन पोलिस महासंचालक म्हणून वर्णी लागली आहे.

@@AUTHORINFO_V1@@