विको लेबॉरेटरीजचा प्रतिष्ठीत पुरस्काराने सन्मान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jun-2018
Total Views |




मुंबई : आपल्या दर्जेदार उत्पादनांमुळे जगप्रसिध्द असलेल्या विको उद्योगसमुहाचे संचालक संजीव पेंढरकर यांना नुकतेच मुंबईस्थित “नॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स अॅंण्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया” यांच्याकडून शनिवारी प्रतिष्ठीत क्वालिटी ब्रँड बिझिनेस अवार्ड देऊन गौरविण्यात आले. हा सोहळा “हॉटेल कोहिनूर काँटिनेन्टल, अंधेरी, मुंबई” येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मानव संसाधन विकास विभागाचे संचालक अविनाशकुमार,अभिनेत्री माधवी निमकर, असोचाम संस्थेचे अध्यक्ष सुजाता देव, शिक्षणतज्ज्ञ अविनाश शर्मा, सुश्री जयश्री टी तसेच जयप्रकाश कर्नाटकी उपस्थित होते.

 

याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करतांना विको लेबॉरेटरीजचे संचालक संजीव पेंढरकर म्हणाले की, दर्जेदार औषधीय वनस्पतींचा वापर करुन विकोने आपल्या उत्पादनांप्रती गुणवत्तेबाबत एक वैश्विक मान्यता मिळविली आहे. विको व्यवस्थापन आणि उत्पादनांवर आमच्या निष्ठावंत ग्राहकांचा असलेला प्रचंड विश्वास आमच्याकरिता महत्वाचा असून, तो आम्हांला कायमच जपायचा आहे. तरुण उद्योजकांना उद्देशून. संजीव पेंढरकरांनी हेही सांगितले की, ग्राहक आस्थेने व स्वखुशीने आयुर्वेदिक उत्पादनांना स्विकारीत आहेत, ज्यामुळे एफएमसीजीत मोठ्य प्रमाणात वाढ झाली आहे.

@@AUTHORINFO_V1@@