विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे वळावे : आ. निरंजन डावखरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jun-2018
Total Views |




मुरबाड : मुरबाड तालुक्यातील मुला मुलींनी स्पर्धेच्या युगात उज्ज्वल भविष्य घडवायचे असेल तर केंद्रीय व राज्यसेवा आयोगाच्या स्पर्धांकडे विद्यार्थ्यांनी वळावे. भविष्यात कोकणातील ग्रामीण भागातून जास्तीत जास्त अधिकारी निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन कोकण पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आ. निरंजन डावखरे यांनी केले. भारतीय जनता पक्ष आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेश पाटील यांच्यावतीने आयोजित या कार्यक्रमास आ. किसन कथोरे, पंचायत समिती सभापती जनार्दन पादिर, उपसभापती सीमा घरत, नगराध्यक्षा शीतल तोंडलीकर, उपनगराध्यक्षा अर्चना विशे, जि. प.सदस्य उल्हास बांगर, सुभाष घरत, तालुकाध्यक्ष जयवंत सूर्यराव, उपाध्यक्ष भास्कर वडवले, माजी नगराध्यक्ष आ. किसन कथोरे, नारायण गोधली, नीतीन मोहपे, सुरेश बागर आणि अन्य मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

शनिवारी मुरबाडमध्ये भाजपच्यावतीने आ. किसन कथोरे यांच्या हस्ते डावखरे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारदेखील डावखरे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि मेहनत करण्याची खूप क्षमता आहे. मात्र, स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी शैक्षणिक यंत्रणा उपलब्ध नसल्याने येथील विद्यार्थी एमपीएससी, युपीएससी सारख्या परीक्षा देत नाहीत. भविष्यात कोकणातील प्रत्येक तालुक्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारणार असून कोणत्याही विद्यार्थ्याला काही अडचण आल्यास आपण सदैव तुमच्या पाठीशी उभे असू, अशी ग्वाही डावखरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली.

@@AUTHORINFO_V1@@