लक्झरी बसमधून पडल्याने एकाचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jun-2018
Total Views |
  
 
पहूर, ३० जून :
शेंदुर्णी ते जळगावकडे जाणार्‍या दुर्गा ट्र्ँव्हल्स एम.एच.४२ बी. १२३ या लक्झरी गाडीतून पडून येथील तरूण मयत झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली.
 
 
शेंदुर्णी येथून मित्राला भेटून पहूरकडे परत येत असतांना शेंदुर्णी-पहूरच्या दरम्यान घोडेश्वर बाबाजवळ लक्झरी बसमधून पडून गंभीर दुखापत झाल्याने पहूरपेठचे अनिल हरी धुरसंधीर (वय ४२) या तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ३० रोजी दुपारी घडली. लक्झरी बसचालक राजू शहा रा. शेंदुर्णी याने बस भरधाव वेगाने चालवून बस मार्गावर वळवितांना बसमध्ये बसलेला अनिल धुरसंधीर यांचा झोल जावून पडल्याचे आल्यानंतरही बस न थांबवता सरळ पहूर पोलिसांना माहिती देवून पुढे निघून गेला. घटनास्थळी अनिल धुरसंधीर हे एकतास पडून होते. मयताचा मुलगा पंकज धुरसंधीर याने पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केल्याने लक्झरी बसचालक राजू शहा यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
माझे वडिल वाचले असते
माझ्या वडिलांवर वेळीच उपचार होणे गरजेचे होते. परंतु त्यांच्यावर बसमधून पडल्यानंतर वेळीच उपचार झाले नाही. उपचार झाले असते तर माझे वडिल वाचले असते अशी खंत पंकज धुरसंधीर याने ‘तरुण भारत’ शी बोलताना व्यक्त केली.
 
@@AUTHORINFO_V1@@