मनसेचा झी २४ तास वृत्तवाहिनीवर बहिष्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांना झी २४ तास या मराठी वृत्तवाहिनीवर बहिष्कार घालण्यात आले असल्याचे पत्रक जाहीर केले आहे. यामध्ये या वृत्तवाहिनीबद्दल अत्यंत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
 
 
 
 
२७ जून २०१८ रोजी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे अत्यंत चूकीच्या पद्धतीचे वृत्तांकन केल्यामुळे आम्ही हे पाऊल उचलत असल्याचे यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच यापुढे या वाहिनीशी कोणत्याही प्रकारचा संवाद ठेऊ नये, महाराष्ट्रभरातील कोणत्याही प्रतिनिधींशी पक्षातील घडामोडींविषयी संवाद साधू नये, त्यांना कोणत्याही पत्रकार परिषदांना, पक्षाच्या सभांना, बैठकांना आणि मेळाव्यांना बोलावू नये, त्यांना प्रसिद्धीपत्रक पाठवू नये त्याचबरोबर प्रवक्त्यांनी त्यांच्या वाहिनीवर भूमिका मांडण्यास जाऊ नये असे स्पष्ट आदेश या पत्रकातून देण्यात आले आहेत.
 
 
यापूर्वीही पक्षाला या वृत्तवाहिनीकडून चूकीच्या प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे मात्र तेव्हा ते अनावधानाने झाले असे समजून पक्षाकडून कोणताही निर्णय घेतला गेला नाही. पण आता मात्र असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, त्यामुळे संबंधित सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या निर्णयाची दखल घेऊन त्याची अंमलबजावणी काटोकोरपणे होईल, याची दक्षता घ्यावी असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.  
 
 
@@AUTHORINFO_V1@@