विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण देण्यामध्ये पालिका शाळेतील शिक्षकांची महत्वपूर्ण भूमिका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jun-2018
Total Views |




मुंबई : महापालिका शाळेतील शिक्षक गुणवंत विद्यार्थ्यांना घडविण्यासोबतच मूल्यशिक्षणाचे महत्वपूर्ण धडे देत असून मूल्यशिक्षण देण्यामध्ये महापालिका शाळेतील शिक्षकांची महत्वपूर्ण भूमिका असल्याचे प्रतिपादन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च - २०१८ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दादर (पूर्व) च्या राजा शिवाजी विद्या संकुलातील प्राचार्य बी.एन.वैद्य सभागृहात शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी उप महापौर हेमांगी वरळीकर, आमदार कालिदास कोळंबकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर, स्थापत्य समिती अध्यक्षा (उपनगरे) साधना माने, माजी महापौर तथा नगरसेविका स्नेहल आंबेकर, स्थानिक नगरसेविका नेहल शहा, नगरसेविका सर्वश्री प्रज्ञा भूतकर, उर्मिला पांचाळ, सिंधु मसुरकर, अंजली नाईक, नगरसेवक सुफिया वणु, सिने अभिनेता सुशांत शेलार, शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे, सुरेंद्र सिंग, उप आयुक्त (शिक्षण)मिलिन सावंत, शिक्षणाधिकारी, महेश पालकर तसेच मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व त्यांचे पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

 

महापौर विश्वनाथ महाडेश्वर बोलताना पुढे म्हणाले की, महापालिका शिक्षकांमध्ये गुणवत्ता ठासून भरली असून गुणवंत विद्यार्थ्यांसोबत महापालिकेचे शिक्षकसुध्दा अभिनंदनास पात्र असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांची जडणघडण करणाऱ्या आईवडीलांसोबत जीवनाचा खरा मार्ग दाखविणारे शिक्षकसुध्दा भगवंत असल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्यात कितीही मोठया पदावर उडी मारली तरी, प्रत्येकाने तारुण्याचा, सौदर्यांचा, संपत्तीचा तसेच सत्तेचा कधीही अहंकार करु नये असेही महापौर म्हणाले. त्यासोबतच गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी हेमांगी वरळीकर म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी नेहमी माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचे वाक्य लक्षात ठेवावे. विद्यार्थ्यांनी स्वप्ने जरुर बघावी परंतु ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणे सुध्दा तेवढेच महत्वपूर्ण आहे. महापालिका शाळेतून तयार होणारा विद्यार्थी हा सर्वांगीण विकास साधणारा असतो असेही त्या म्हणाल्या. दरम्यान शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयोजनाची रुपरेषा मांडली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या ४७ विद्यार्थ्यांना रोख दहा हजार रुपये व प्रमाणपत्र तसेच उर्वरित विद्यार्थ्यांना रोख पाच हजार रुपये व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. त्यानंतर शंभर टक्के निकाल लागलेल्या तेरा शाळांना रोख पंचवीस हजार व ८५ टक्क्यांपेक्षा जास्त निकाल लागलेल्या ४९ शाळांना रोख पंधरा हजार रुपये व प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

@@AUTHORINFO_V1@@