बेंडाळे चौकात डंपरची दुचाकीला धडक, वृध्द जखमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
 
जळगाव, ३० जून :
जळगाव शहर आणि वाळू वाहतूक हे समिकरण बनले आहे. वाळूवाहतूकीमुळे शेकडो अपघात झाले असून अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पुष्पलता बेंडाळे चौकात डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकी स्वाराच्या पायाला जबर दुखापत झाली आहे.
 
 
पुष्पलता बेंडाळे चौकात बारा वाजेच्या सुमारा डिगंबर गोविंद खडके (वय ७२) हे पत्नी शोभा डिगंबर खडके व नातीसह दुचाकी क्र. एमएच १९, एन. १९५७ ने जात असतांना वाळू घेवून भरधाव डंपर क्र. एमएच १९, झेड ३९७६ ने त्यांना धडक दिली. यात दुचाकीच्या मागील बाजूचे नुकसान झाले आहे. तसेच डिगंबर खडके यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली. अपघातानंतर उपस्थित नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. नागरिकांचा क्रोध पाहून डंपरचालकाने त्वरित पळ काढला. संतप्त नागरिकांनी डंपरवर दगडफेक केली. त्या डंपरच्या काचा फुटल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली.
 
घटनास्थळी तीन पोलीस ठाण्यांच्या हद्द
पुष्पलता बेंडाळे चौकात शहर पोलिस ठाणे, शनिपेठ पोलीस ठाणे व जिल्हापेठ पोलीस ठाण्याची हद्द आहे. घटना स्थळ मधोमध असल्याने कोणत्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होईल याबाबत घटनास्थळी चर्चा होती.
 
नागरिकांचा संताप
शहरात वाळूवाहतूकीमुळे बालकांपासून वृध्दांपर्यंत नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. असे असूनही प्रशासनाच्या कृपेने पावसाळ्यातसुध्दा वाळू वाहतूक कशी होते. याबाबत उपस्थित नागरिकांच्या भावना तीव्र होत्या.
 
वाहतूक पोलिसांना शिस्त लावण्याची गरज
अपघात घडला त्यावेळेस सिग्नल नसतांना डंपरचालक भरधाव घुसला आणि त्याने वाहतूकीचा नियम भंग केला. घटनास्थळी वाहतूक पोलीस चौकाच्या चारही कोपर्‍याला उभे असताना ही घटना घडली. नागरिकांचा संताप पाहून पोलिसांनी पोलीस एकत्र आहे. वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीत विनाक्रमांकाचे वाळू असलेले डंपर राजकमल चौकातून बंेंडाळे चौकाकडे येत होते. हा खेळ दररोजचा असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने वाहन धारकांना शिस्त लावण्याऐवजी वाहतूक पोलिसांनाच शिस्त लावणे शहराच्या वाहतूकीच्या सोयीने अधिक चांगले होईल अशी चर्चा सुरू आहे.
@@AUTHORINFO_V1@@