एअर डेक्कनची ढिसाळ सेवा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jun-2018
Total Views |

खा.ए.टी.पाटील यांनी घेतली मंत्री सुरेश प्रभुंची भेट

 
जळगाव :
एअर डेक्कन या विमान सेवा संस्थेतर्फे सेवा देण्यात येत होती. मात्र, सततच्या खंडित सेवेमुळे जळगावातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांना मुंबईला जाणे आणि मुंबईहून जळगावला येणे कठीण झाले आहे. एअर डेक्कनच्या ढिसाळ सेवेऐवजी एअर इंडिगो किंवा इतर गुणवत्ता सेवा देणार्‍या विमान सेवा कंपनीला जळगाव/मुंबई/जळगावकरिता त्वरित कार्यरत करण्याची आग्रही मागणी नवी दिल्ली येथे खा.ए.टी.पाटील यांनी नागरी उड्डयन मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेवून केली.
 
 
दरम्यान उडाण योजनेअंतर्गत सुरू झालेली जळगाव-मुंबई-जळगाव विमान सेवा गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. यामुळे जळगावातील उद्योजक, व्यापारी व नागरिकांना या सेवेमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.खा.पाटील यांनी केलेल्या मागणीला मंत्री सुरेश प्रभु यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर यावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
@@AUTHORINFO_V1@@