ही राजकीय हत्या आहे : प्रकाश जावडेकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
कलकत्ता येथे दोन तरुणांची करण्यात आलेली हत्या, राजकीय हत्या आहे. आतापर्यंत १९ भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे. अलिकडे पश्चिम बंगालमध्ये झालेली हत्या अमानवी आहे. आम्ही या निर्दयी राजकीय हत्येचा व हत्या संस्कृतीचा निषेध करतो. अशा कार्यात सहभागी असलेल्यांना पश्चिम बंगालची जनता धडा शिकवेल. राजकीय हत्यांना लोकशाहीत जागा नाही," अशा भावना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. कोलकाता येथे माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
 
शुक्रवारपासून बेपत्ता असलेले भाजप कार्यकर्ते दुलाल कुमार यांचा मृतदेह पुरुलिया जिल्ह्यातील बलरामपूर येथे एका खांबावर लटकलेला आढळला. काही आठवड्यांपूर्वी याच जिल्ह्यात भाजपच्या त्रिलोचन महतो यांचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळला होता. या दोन्ही हत्यांमुळे या परिसरात खळबळ माजली आहे. केवळ राजकीय हेतूमुळे ही हत्या करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
पश्चिम बंगाल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण चौकशीसाठी गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविण्यात आले आहे. यापूर्वी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी पश्चिम बंगालमधील भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्येवरुन तृणमूल काँग्रेस पक्षावर टीका केली होती.
@@AUTHORINFO_V1@@