येत्या आठवड्यात राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jun-2018
Total Views |




पुणे :
मान्सूनचे दक्षिण भारतात आगमन झाल्यापासून राज्यामध्ये मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली असून येत्या आठवड्याभरात राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेने आज दिली आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासह सर्वत्र मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन वेधशाळेने केले आहे.


गेल्या तीन दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये कमाल तापमान हे सरासरी पेक्षा वाढले आहे, तर काही ठिकाणी मात्र हे तापमान सरासरी पेक्षा कमी झाले असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे. तसेच येत्या ९ तारखेपर्यंत राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहणार असून मेघगर्जेनेसह पाऊस होणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात राज्यातील किमान तापमान २४ अंशांपर्यंत जाण्याची देखील शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.


वादळामुळे झाड कोसळून चार जणांचा मृत्यू

राज्यात सुरु असलेल्या मान्सून पूर्व पावसामुळे धुळे जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. काल रात्री मराठवाड्यात झालेल्या वादळी पावसामुळे एका घरावर झाड कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला. मृतांमध्ये एक महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. दरम्यान नगर जिल्ह्याला देखील वादळी वाऱ्यांचा मोठ फटका बसला असून अनेक ठिकाणी वादळामुळे घरांवरील पत्रे उडून गेल्याची घटना घडली आहे.


हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे यंदा मान्सून हा वेळे अगोदरच केरळात दाखल झाला आहे. आपल्या आगमनाबरोबरच दक्षिण भारताला पहिला तडाखा दिल्यानंतर मान्सूनने उत्तरेकडे वाटचाल करण्यास सुरुवात केली होती. परंतु लक्षद्वीपांच्या वरी आल्यानंतर मात्र त्याचा वेग मंदावला होता. परंतु या दरम्यान राज्यात मात्र मान्सून पूर्व पावसाने आपली दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@