रत्नागिरीजवळ पाच पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jun-2018
Total Views |



रत्नागिरी : रत्नागिरीमधील समुद्रकिनाऱ्याजवळ पर्यटनासाठी म्हणून आलेल्या पाच नागरिकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. समुद्राला आहोटी आल्यामुळे हे सर्व पर्यटक बुडाल्याची माहिती समोर आली असून यातील एकाला वाचवण्यात मात्र स्थानिक नागरिकांना यश आले आहे.

बुडालेली सर्व पर्यटक हे मुंबईमधील बोरीवली येथील स्थानिक रहिवासी असल्यायची माहिती समोर आलेली आहे. बोरीवलीहून एकूण सात पर्यटक रत्नागिरीमध्ये फिरण्यासाठी म्हणून आले होते. आज संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हे सर्व आरेवारे समुद्र किनारावर आले होते. यावेळी यातील सहा जण हे समुद्रामध्ये पोहण्यासाठी म्हणून गेले. परंतु अचानक समुद्राला आहोटी लागल्यामुळे सर्व जण पाण्यामध्ये ओढले जाऊ लागले. यानंतर बाहेर असलेल्या नागरिकाने आरडओरडाकडून स्थानिक नागरिकांना मदतीसाठी बोलले. नागरिकांनी सर्वांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने फक्त एकालाचा वाचवण्यात नागरिकांना यश आले.

दरम्यान स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना याघटनेविषयी माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मृतदेहाचा शोध घेण्यास सुरवात केली आहे. स्थानिक नागरिकांना याविषयी विचारणा केली असता नागरिकांनी या सर्वांना या अगोदरच समुद्रात उतरण्याविषयी सावध केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. दोन दिवस झालेल्या पाऊसमुळे समुद्राचे पाणी खवळलेले आहे, त्यामुळे पर्यटकांनी पाण्यात जाऊ नये, असा सल्ला ग्रामस्थांनी दिला होता. परंतु ग्रामस्थांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून हे सर्वजण पाण्यात उतरल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.
@@AUTHORINFO_V1@@