सहलीसाठी महाराष्ट्रात आलेल्या बसला अपघात, १२ प्रवासी गंभीर जखमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jun-2018
Total Views |

 
पुणे - मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथून सहलीसाठी महाराष्ट्रात आलेल्या एका बसचा आज अपघात झाला आहे. या अपघातात १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. पुण्यातील बोपदेव घाटाजवळ हा अपघात झाला. जखमींना सासवड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लोहपुरुष ट्रॅव्हल्स असे या बसचे नाव आहे. या बसमध्ये एकूण ५५ प्रवासी होते. राष्ट्रीय ज्ञानवर्धिनी दृष्टी शिबिर अंतर्गत महाराष्ट्रातील धार्मिक आणि पर्यटन स्थळांमध्ये सहल आयोजित करण्यात आली होती. काल ही बस पुण्यात पोहोचली होती. तसेच प्रवाशांचा मुक्काम रात्री पुण्यातच होता.
त्यानंतर आज पंढरपूरला जात असताना सकाळी ७ वाजता वाटेत हा अपघात घडला. .बोपदेव घाट चढून वर आल्यानंतर लगेच असलेल्या उताराला ही बस पलटी झाली. यात बसमधील १० ते १२ प्रवासी जखमी झाले आहेत. बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला, असे सांगण्यात येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@