विधान परिषदेचे निकाल जाहीर; कोकणातून भाजपचे डावखरे विजयी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jun-2018
Total Views |



 

मुंबई : विधान परिषदेच्या कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर, तर मुंबई शिक्षक आणि नाशिक विभाग शिक्षक या चारही मतदारसंघाच्या जागांचा निकाल जाहीर झाला आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेर भाजपाचे निरंजन डावखरे यांनी बाजी मारली. डावखरे यांनी प्रतिस्पर्धी शिवसेनेचे संजय मोरे यांचा २९८८ मतांनी पराभव केला. डावखरे यांना ३२८३१ मते मिळाली. तर राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. 'अपेक्षेप्रमाणे यश मिळाले. सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. दररोज डावखरेसाहेबांची आठवण येते, अशी प्रतिक्रिया निरंजन डावखरेंनी विजयानंतर दिली.

 

दरम्यान, नाशिकमधून शिवसेना पुरस्कृत उमेदवार किशोर दराडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्ष पुरस्कृत संदीप बेडसे यांचा पराभव केला. तर मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात शिवसेना आणि लोकभारतीला आपला गड कायम राखण्यात यश आले आहे. पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार विलास पोतनीस यांनी भाजपाचे अमितकुमार मेहता यांचा ११६११ मतांनी पराभव केला. तर शिक्षक मतदारसंघातून कपिल पाटील यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येत आपले वर्चस्व दाखवून दिले.

 

विजयी उमेदवार व मिळालेली मते

 

कोकण - निरंजन डावखरे (भाजप) - ३२८३१

नाशिक - किशोर दराडे (शिवसेना) - २४३६९

मुंबई शिक्षक - कपिल पाटील (लोकभारती) - ४०५०

मुंबई पदवीधर - विलास पोतनीस (शिवसेना) - १९३५४

@@AUTHORINFO_V1@@