हरवलेल्या लहानग्यांचा "रियुनाईट" घेणार शोध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jun-2018
Total Views |

वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते नव्या अॅपचे लाँचिंग


 
 
 
दिल्ली : भारतातील विविध ठिकाणी, प्रवासात अनेक मुलं हरवल्याच्या घटना रोज ऐकायला मिळतात. भारतातील अशा हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी एका सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला असून डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करुन घरापासून दूरावलेल्या लहानग्यांचा आता शोध घेता येणार आहे. बचपन बचाव आंदोलन या सामाजिक संस्थेने केपजेमिनी यांच्या सहकार्याने "रि-युनाईट" हे अॅप्लिकेशन विकसीत केले असून वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते नुकतेच या अॅपचे उद्घाटन करण्यात आले आहे. याप्रसंगी नोबेल पुरस्कार विजेते आणि बचपन बचाओ आंदोलनाचे संस्थापक, कैलाश सत्यार्थीही उपस्थित होते.
 
या अॅपचा उपयोग वेगवेगळ्या गोष्टींमधून करता येणार आहे. जसे की लहान मुलांचा शोध घेण्यासाठी तसेच त्यांची ओळख पटवण्यासाठी यामध्ये पालक किंवा नागरिक मुलांचे फोटो अपलोड करु शकणार आहेत त्याचबरोबर त्यांची अधिक माहिती त्यांचे नाव, जन्मखूण, घरचा पत्ता, हरवल्याची तक्रार दाखल केलेले पोलीस ठाण्याचा अहवाल याची माहिती देता येणार आहे. यामधील फोटो मोबाईलच्या मेमरीमध्ये जतन करता येणार नाहीत. यामध्ये अमेझॉन रिकॉग्निशन आणि वेब फेशिअल रिकॉग्निशन सर्व्हिस याचा वापर मुलांना ओळखण्यासाठी करता येणार आहे. तसेच हे अॅप अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्हीसाठी उपलब्ध असणार आहे.
 
यावेळी प्रभू म्हणाले की, ज्या पालकांची मुले हरवली आहेत, त्यांना एकत्रित करण्यासाठी वास्तविक जीवनातील सामाजिक आव्हानांना तोंड देण्यासाठी तंत्रज्ञानाचा अशा प्रकारे वापर करण्याचा हा उत्तम प्रयत्न आहे, असे प्रतिपादन प्रभू यांनी केले. तसेच या तंत्रज्ञानाचे कौतुक करत या अॅपचा पीडित कुटुंबाना मोठ्या प्रमाणात फायदा होईल, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.
 
 
 
 
बचपन बचोओ आंदोलन ही लहान मुलांच्या संरक्षणासाठी काम करणारी भारतातील सर्वात मोठी चळवळ आहे. त्याबरोबरच त्यांच्याविषयक कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या ऐजन्सी आणि धोरणकर्त्यांसह कार्य करते. बाल अधिकाऱ्यांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे तयार करण्यात आले आहेत, त्या कायद्यांच्या कामात या चळवळीने महत्वाची भूमिका बजावली आहे. २००६ मध्ये निठारी येथे झालेल्या घटनेपासून याची सुरुवात झाली होती
 
@@AUTHORINFO_V1@@