अमेरिकेचा पाकिस्तानला पुन्हा एकदा इशारा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jun-2018
Total Views |

दह्शतवाद्यांच्या आश्रयदात्यांवर कठोर कारवाईचा इशारा


वॉशिंग्टन : दहशतवाद्यांना आश्रय देण्याच्या मुद्द्यावरून अमेरिकेने आज पुन्हा एकदा पाकिस्तानला खडसावले आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करावी, असा सल्ला अमेरिकेने पाकिस्तानला आज पुन्हा एकदा दिला आहे. तसेच दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशांविरोधात अमेरिका कठोर पावले उचलणार असल्याचे देखील अमेरिकेने म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या सभेमध्ये अमेरिकेने काल आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सर्व देशांना मदत करण्यासाठी अमेरिका हा नेहमीच पुढाकार घेत आला आहे. सर्व देशांमध्ये परस्पर सहकार्य वाढावे, व्यापार वाढवा, मदत वाढावी म्हणून अमेरिकेने नेहमी पुढाकार घेतला तसेच सहाय्य केले. परंतु दहशतवादाच्या मुद्दावर मात्र कोणत्याही देशाला कधीही सहाय्य केले जाणार नाही' असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. तसेच पाकिस्तानचे थेट नाव घेत पाकिस्तानने दहशतवादी गटांवर कारवाई करावी, असे देखील अमेरिकेने म्हटले आहे.

अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता आल्यापासून अमेरिका आणि पाकिस्तान यांच्या संबंधांमध्ये सातत्याने तणाव निर्माण होत आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावरून ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्यावरून वारंवारपणे खडसावले आहे, तसेच अमेरिकेकडून पाकिस्तानला देण्यात येणारी आर्थिक मदत देखील अमेरिकेने कमी केली आहे.
@@AUTHORINFO_V1@@