शोपियां येथे भारतीय लष्करावर ग्रेनेड हल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jun-2018
Total Views |

 
 
जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीर येथे पुन्हा एकदा सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. पहाटेच्या सुमाऱ्यास दहशतवाद्यांनी भारतीय लष्करावर ग्रेनेड हल्ला केला, ज्यामुळे खळबळ माजली. या हल्ल्याचे चोख प्रत्यूत्तर भारतीय लष्कर देत आहे. या हल्लल्यात भारतीय सेनेचा एक जवान जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर एक दहशतवाद्याला कंठस्थान घालण्यात भारतीय सैन्य़ाला यश मिळाले आहे.
 
आज सकाळी भारतीय सेनेची एक तुकडी सकाळी गस्त घालत होती, त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागू नये आणि त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी घटनास्थळ रिकामे करण्यात आले आहे.
 
कुपवाडा येथे देखील चकमक सुरु :

कुपवाडा येथील जंगलात देखील भारतीय सेना आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरुच आहे. येथे दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती सेनेला मिळाली होती. त्यानंतर कारवाई केली असता सेनेच्या जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्थान घतले आहे. या आधी १० जून रोजी कुपवाडा येथे झालेल्या चकमकीत सेनेने ६ दहशतवाद्यांना कंठस्थान घातले होते.
@@AUTHORINFO_V1@@