पुण्यात मनसेची अरेरावी , व्हीडीयो व्हायरल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jun-2018
Total Views |

 
 
पुणे :  पुण्यात मल्टिप्लेक्समध्ये अधिक दरात खाद्य पदार्थ विकत असल्याने नाराज होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अरेरावी करत पीव्हीआर येथील व्यवस्थापकाला मारहाण केली आहे. मल्टिप्लेक्समध्ये ५ रुपयाचे पॉपकॉर्न २५० रुपयाला का ? , असा प्रश्न खुद्द न्यायालयाने उपस्थित केल्यानंतर मनसैनिकांनी आज थेट सेनापती बापट रस्त्यावरील पीव्हीआरमध्ये धडक दिली.
 
 
 
यावेळी त्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण करत तमाशा केला. यामुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी मनसेचे पदाधिकारी किशोर शिंदेसह १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेनापती बापट रस्त्यावरील नवीनच सुरु झालेल्या 'पॅव्हेलियन' मॉल मध्ये असलेल्या पीव्हीआर मध्ये मनसेच्या सैनिकांनी मारहाण केली. तसेच यावेळी त्यांनी अर्वाच्य शब्दांचा वापर देखील केला आहे.
 
मल्टिकप्लेक्समधील पॉपकॉर्नच्या किमतीवरून मनसे आक्रमक झाली आहे. मनसैनिकांनी पीव्हीआरच्या व्यवस्थापनाला ५ रुपयांचे पॉपकॉर्न २५० रुपयाला का असा जाब विचारला. तसेच १० रुपयांचा वडापाव १०० रुपयाला का विकता असे विचारून मनसेच्या कार्यकर्त्यांनी नेहमीप्रमाणे मारहाण करत आंदोलन केले. यावेळी मनसेचे किशोर शिंदे, रमेश परदेशी या पदाधिकाऱ्यांसह मनसैनिकांनी पीव्हीआरमधील खाद्यपदार्थ विक्री काउंटरवर जाऊन घेराव घालत आंदोलन केले.
 
मराठी वाचता आलीच पाहिजे :

यावेळी किशोर शिंदे यांनी तेथील कर्मचाऱ्याला मराठी वाचता आलीच पाहिजे, असा आग्रह धरत खडसावले आहे. दर न बदलल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.
@@AUTHORINFO_V1@@