पोषण अभियान एक जन आंदोलन बनले आहे : नीती आयोग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
नवी दिल्ली : देशामध्ये पोषण अभियान हे एक जनआंदोलन बनले आहे अशी माहिती नीती आयोगाने दिली आहे. सध्या देशातील नागरिकांना पोषक आहाराचे महत्व चांगलेच कळाले असल्याने आपल्या बालकांना तसेच स्वत: देखील नागरिक आपल्या आहाराचा विशेष सांभाळ करतात अशी माहिती नीती आयोगाने दिली आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी ही माहिती जाहीर केली आहे. 
 
 
 
 
 
देशामध्ये कुपोषणाचा आकडा वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पोषण योजना सुरु केल्यापासून देशामध्ये पोषण या विषयाला जास्त महत्व दिले जात आहे. २०२२ पर्यंत ६ ते २५ वर्षं गटातील युवकांना तसेच बालकांना कुपोषणापासून दूर करून हे प्रमाण २५ टक्के पर्यंत खाली आणायचे आहे. 
 
 
 
 
 
त्यामुळे याला केवळ सरकारच करू शकेल असे म्हणणे योग्य ठरणार नाही. यात जनभागीदारी देखील महत्वाची आहे. म्हणून जनतेने यात अजून सहभाग घेणे गरजेचे आहे असे नीती आयोगाने स्पष्ट केले आहे. 'टेक- थॉन : पोषण अभियानाला देखील चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@