विधानपरिषदेमध्ये सेनेची सरशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jun-2018
Total Views |

चार पैकी दोन जागांवर सेना तर कोकणात भाजपाचा विजय




मुंबई :
तब्बल २४ तासांच्या मतमोजणीनंतर विधान परिषदेच्या चार जागांचे निकाल अखेर जाहीर झाले आहेत. कोकण-मुंबई पदवीधर आणि मुंबई-नाशिक शिक्षक मतदार संघाच्या चार जागांचे निकाल जाहीर झाले असून या चार जागांपैकी दोन जागांवर शिवसेनेनी बाजी मारली आहे. मुंबई पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदार संघामध्ये शिवसेनेनी विजय मिळवला असून कोकणामध्ये मात्र भाजपने बाजी मारली आहे. तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी-कॉंग्रेसच्या पाठबळावर लोकभारतीने आपला झेंडा लावला आहे.

आज सकाळीच निवडणूक आयोगाने या विषयी अधिकृत घोषणा केली आहे. यामध्ये मुंबई पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदार संघामध्ये शिवसेनेचे अनुक्रमे विलास पोतनीस आणि किशोर दराडे हे विजयी झाले आहेत. यामध्ये पोतनीस यांनी भाजपाच्या अमितकुमार मेहता यांचा ११ हजार ५६२ मतांनी पराभव केला. तर दराडे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप बेडसे यांच्यावर १० हजाराहून अधिक मतांनी विजय मिळविला. यानंतर सर्व राज्याचे लक्ष लागलेल्या कोकणातील जागेवर भारतीय जनता पक्षाच्या निरंजन डावखरे यांनी विजय मिळवला आहे. काल उशिरापर्यंत मत मोजणी सूर असताना डावखरे यांनी राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला आणि शिवसेनेचे संजय मोरे या दोघांनाही पराभूत करत आपला विजय साजरा केला.

यानंतर मुंबई शिक्षक मतदार संघामध्ये लोकभारतीचे कपिल पाटील यांनी सेना आणि भाजपच्या उमेदवारांना मागे टाकत विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे पाटील यांच्या या विजयामध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचा मोठा वाटा असून या दोन्ही पक्षांचा पाठबळावर पाटील यांनी हा विजय मिळवला आहे.
@@AUTHORINFO_V1@@