जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवादी आणि लष्करात चकमक सुरु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jun-2018
Total Views |

 
 
पुलवामा :  आज सकाळी जम्मू काश्मीरच्या कुपवाडा येथे लष्करावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यानंतर पुलवामा येथे देखील आता लष्कर आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु आहे. दहशतवादी लपले असल्याच्या माहितीवरुन राष्ट्रीय रायफल्स आणि पोलिसांच्या एका तुकडीने कारवाई केली. दरम्यान किती दहतवादी लपले होते, याविषयी अद्याप माहिती मिळाली नाही.
 
गावातील सर्व रस्ते बंद केल्यानंतर सुरक्षा रक्षक बाहेर पडत असताना ही घटना घडली. दहशतवाद्यांनी देखील लष्करावर हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल लष्कराने देखील गोळीबार केला.
 
 
 
 
 
दरम्यान आज सकाळी देखील शोपियाँ येथे पुन्हा एकदा सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. पहाटेच्या सुमाऱ्यास दहशतवाद्यांनी भारतीय लष्करावर ग्रेनेड हल्ला केला, ज्यामुळे खळबळ माजली. या हल्ल्याचे चोख प्रत्यूत्तर भारतीय लष्कराने दिले. या हल्ल्यात भारतीय सेनेचा एक जवान जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर एक दहशतवाद्याला कंठस्थान घालण्यात भारतीय सैन्य़ाला यश मिळाले आहे.
@@AUTHORINFO_V1@@